जालना: नगरसेविका कार्तिकी इंगळे यांच्या पतीचे कथित ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल; प्रभाग १० मध्ये नाराजी
Jalna, Jalna | Jul 2, 2026 जालना : प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत असंतोष वाढत असतानाच नगरसेविका कार्तिकी मनोज इंगळे यांच्या पती मनोज इंगळे यांचे एक कथित ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभागातील नागरिक मंगेश कराळे यांनी नागरी समस्यांबाबत मनोज इंगळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, संभाषणादरम्यान अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा तसेच "तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, त्यामुळे तुमचे काम करणार नाही," अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आ