जालना: लक्ष्मीनारायण पुरा येथे टोळक्याकडून घरात घुसून मारहाण ,घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Jalna, Jalna | Jun 20, 2026 आज दिनांक 20 जून 2020 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील लक्ष्मीनारायण पुरा येथे 30 ते 40 जणांच्या टोक्याकडून किशोर कांबळे यांच्या घरात घुसून लाट्या काठ्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये जखमेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सदरची घटना 17 जून रोजी आहे, या घटनेची माहिती मिळताच आज कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमेची विचारपूस केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.