भोकरदन: नांजा फाटा चौक ते छ.शिवाजी महाराज व परिसरात श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज पादुका दर्शन मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात पार
आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील नाजा फाटा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक या पादुका रथात ठेवत ढोल ताशाचा गजरात हा रथ संपूर्ण भोकरदन शहरात फिरवण्यात आला याप्रसंगी महिला मंडळ पुरुष मंडळ तसेच महिलांनी डोक्यावर तुळस कळस घेत या मिरवणुकीत सहभाग घेतला होता या मिरवणुकीने वातावरण अगदी भक्तीने झाल्याचे पाहायला मिळाले.