नागपूर ग्रामीण: १० वी-१२ वीचे निकाल लांबणीवर? शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा २८ एप्रिलपासून ‘कामबंद’चा इशारा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंडळाने पदोन्नती आणि बदलीच्या धोरणात केलेल्या बदलांमुळे कर्मचारी संतप्त असून, २८ एप्रिलपासून राज्यव्यापी ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे निकाल वेळेत लागण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.