आज दिनांक 17 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील काही धनगर समाज बांधवांनी एकत्र येत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या वर पोलिसांनी जी धडपशाही केली आहे व त्यांना डिटेन करून पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून ठेवले आहे,या पोलिसांच्या कृत्याचा या धनगर समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये निषेध करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.