अहमदपूर: प्रसाद गार्डनच्या पाठीमागील साईनगर येथील गोविंद गोपाळराव भगत या 55 वर्षीय शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
Ahmadpur, Latur | Sep 19, 2025 कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; अहमदपूरमध्ये हळहळ शहरातील साई नगर भागात राहणारे ५५ वर्षीय शेतकरी गोविंद गोपाळराव भगत यांनी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाचा बोजा आणि मुलाच्या भविष्याची चिंता याला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.