अकोट: नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन प्रक्रीयेस प्रारंभ मात्र प्रमुख पक्षांकडून अद्याप उमेदवार घोषणा बाकी
Akot, Akola | Nov 10, 2025 अकोट नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठीच्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस आज सोमवारपासून प्रारंभ झालाय नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेसह निवडणूक कार्यक्रम व निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे मात्र आज अद्याप पर्यंत प्रमुख राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा केली नसल्याने पहिल्या दिवशी नामनिर्देशन प्रक्रिया ही राजकीय निरीक्षकांसह नागरिकांसाठी प्रतीक्षेची ठरली आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रीयेस गती येणार आहे.