जालना: दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात ५० टक्के सवलत द्या; नगरसेवक अमोल ठाकूर यांची सर्वसाधारण सभेत मागणी*
Jalna, Jalna | Jul 16, 2026 जालना शहरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अमोल ठाकूर यांनी जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. यावेळी त्यांनी ही मागणी आयुक्त अंजली शर्मा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि नगरसचिव केशव कानफुडे यांच्यासमोर मांडली. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा तसेच त्यांच्यावरील कराचा भार कमी व्हावा, या उद्देशाने ही सवलत लागू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या मागणीची आयुक्त अंजली शर्मा