जनजागृतीसाठी बॅनर, पोस्टर, पत्रके, सोशल मीडिया, गृहभेटी, शाळा-महाविद्यालयांतील सत्रे, प्रश्नमंजुषा, रांगोळी व निबंध स्पर्धा, महिला मंडळे आदी माध्यमांचा वापर केला जाणार आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. Gondia