सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 24 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनेचे पैसे खात्यात जमा होत असल्याची भीती दाखवत लाखो रुपये उकळणाऱ्या महिलेला विरार येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी महिलेच्या इतर साथीदारांचा शोधही पोलीस घेत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे