अकोला : शहरात थंडीचा जोर वाढला असून दिनांक 13 डिसेंबर रोजी किमान तापमान 11.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पहाटेपासून गार वारे वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. थंडीपासून बचावासाठी शहरातील चौकाचौकांत व गल्ल्यांमध्ये ठिकठिकाणी आग पेटवून नागरिक शेक घेताना दिसत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच मजूर वर्गावर थंडीचा विशेष परिणाम जाणवत असून उबदार कपड्यांचा वापर वाढला आहे. भीम नगर चौकात सायंकाळी ८ वाजता शेक पेटवून नागरिक बसलेले दिसून आले.