पाचोरा: पाचोरा ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला, रेल्वे अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती,
पाचोरा ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असल्याची घटना आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे, पाचोरा रेल्वे जंक्शन जवळील पाचोरा ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान खंबा किलोमीटर 384/1 डाऊन लाईन जवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला, घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे जय मल्हार रुग्णवाहिका संचालक बबलू मराठे यांचे मदतीने आणला,