नांदेड: शहरातील पुरग्रस्तांना ₹ 50 हजार आर्थिक मदत व संसार उपयोगी साहित्य द्या; रिपब्लिकन हक्क परिषदेची पालकमंत्री सावेकडे मागणी
Nanded, Nanded | Sep 17, 2025 आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय समोर रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, नांदेड शहरातील पुरग्रस्तांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी व नुकसान ग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य देण्यात यावे या मागणीचे निवेदन आज पालकमंत्री अतुल सावे यांना दिले असल्याची सविस्तर माहिती आज रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे यांनी दिली आहे.