पाचोरा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाचोऱ्यातील जारगाव चौफुलीवर महाविकास आघाडीचे रास्तारोको आंदोलन,
जळगावच्या पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान मिळावे आणि दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, यासाठी महाविकास आघाडीतर्फे आज जारगाव चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कपाशी खरेदीसाठी CCI सुरू करणे, सोयाबीन व ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करणे, अनुदान घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे.