एकोणवीस नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गणेश पेठ पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबिका हॉटेलच्या मागे घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव स्वप्निल निषाद असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून बाराशे रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे..