नगर: नवरात्रौत्सवाच्या काळात मोहटादेवी गड दर्शनासाठी २४ तास खुला
शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा नवरात्रीचा कालावधी असून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश देवींच्या मंदिरांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गड येथे देखील शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. नवरात्रीत मोहटादेवी गडावर दरवर्षी अंदाजे १० ते १५ लाख भाविक उपस्थित राहतात