लोहा: पांगरी रोडवर पहाटेच्या सुमारास 20 लाखाच्या हायवा टिप्पर मध्ये 25 हजाराची अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
Loha, Nanded | Oct 25, 2025 नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे पांगरी रोडवर दि 24 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे पाचच्या सुमारास यातील आरोपी चंद्रकांत गवते व इतर एक हे विनापरवाना बेकायदेशीरित्या आपले ताब्यातील हायवा क्रमांक एमएच 26 सीएच 3300 किमती 20 लाख रुपये यामध्ये पाच ब्रास रेती किमती 25 हजार रुपयाची मुद्देमाल छोटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आले.याप्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.