जालना: शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जालना महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना दरमहा मानधन सुरू करण्याची मागणी; राहुल मुळे यांचे पुन्
Jalna, Jalna | Jul 9, 2026 जालना महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना दरमहा मानधन सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी राज्याचे नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा निवेदन सादर करून शासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात राहुल मुळे यांनी म्हटले आहे की, सध्या वाढत्या महागाईमुळे दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहे. रोजगाराच्या मर्यादित संधी, वाढता वैद्यकीय खर्च आणि इतर आवश्यक गरजा पूर्ण करताना अनेक दिव्यांगांना आर्थिक अडचण