नरखेड तालुक्यातील बेलोना येथे पुरुषोत्तम नामदेवराव गायधने (४४) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ६ जानेवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामीण भागातील वाढत्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम गायधने यांच्याकडे दोन एकर शेती असून ते शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेनंतर घरात कोणीही नसताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.