जालना: जालन्यात तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार; पिडीत कुटुंबाचे न्यायासाठी उपोषण; धमक्या आणि दबावाचे आरोप;पीडित कुटुंबाचा आरोप
Jalna, Jalna | Apr 29, 2026 जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावात तेरा वर्षीय मुलीवर अन्याचार झाल्याची घटना समोर आली असून त्यातील आरोपी गुन्हा दाखल असल्यापासून अद्याप अटक केली नाही. त्यामुळे पिडीत कुटुंबाने पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमो आमरण उपोषण सुरु केले आहे. बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.