कळमनूरी: तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पी .पी शेळके यांची दूरदर्शन सल्लागार समितीवर निवड
कळमनुरी तालुक्यातील संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी पी शेळके यांची दूरदर्शन सल्लागार समितीवर निवड करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे प्राप्त झाली आहे .त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे .