राज्यातील सहकार चळवळीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सहकारी संस्थांचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत सहकार पुरस्कार देण्यात येतो. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारे या पुरस्कारासाठी संस्थांची निवड होणार असून इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव १८ जुलै २०२५ या कालावधीत संबंधित तालुका सहायक/उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.