अकोला शहरातील मारोतीनगर, बाळापुर रोड परिसरातील अक्षय विनायक नागलकर (वय 26) हा 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडला आणि तेव्हापासून बेपत्ता आहे. आई शिला नागलकर यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. तीन दिवस उलटूनही अक्षयचा शोध लागला नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यादरम्यान, डाबकी रोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम आरोपीच्या पकडण्यासाठी रवाना झाली आहे.