पाचोरा: जळगाव जिल्हा अलर्टच्या दिशेने, पाचोऱ्यात जोरदार पावसाला सुरुवात, काळजी घेण्याचे आवाहन,
प्रादेशीक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सतर्कतेच्या इशा-यानुसार जळगाव जिल्हयासाठी दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी ऐलो अलर्ट जारी केलेला आहे. जिल्हयात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील अजिंठाघाट परिसरात मागील आठवडयात झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्हयातील पाचोरा, भडगाव, तालुक्यातील नदीकाठची गावे प्रभावीत झालेली होती,,