रायगड : देशाच्या सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी अनैसर्गिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे. ऊर्जा संवर्धनातून पर्यावरण रक्षणासोबतच पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सौर, पवन ऊर्जेचा स्वीकार आणि ऊर्जेचा काटकसरीने वापर हीच आजची खरी गरज आहे.