गोरेगाव: मुंडीपार ते मुरदोली दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार ते मुरदोली दरम्यान टिप्पर ने मोटरसायकल ला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालकासह एकाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना आज दिनांक 19 ऑक्टोबर च्या सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली. दिनेश पंधरे वय 32 व देवेंद्र उईके वय 35 रा. बाघाटोला पोस्ट सावरी खुर्द जिल्हा बालाघाट असे अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या युवकांचे नाव आहे.