मालेगाव येथील ३२७३ बोगस मतदारांची नावे रद्द करा- किरीट सोमय्या
मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील ३२७३ लोकांची जन्म प्रमाणपत्र मालेगाव महापालिकेने रद्द केली आहे. त्यांची आधारकार्ड ही रद्द करण्यात येत आहे. त्यांची नावे मतदार यादीतून वगळावी अशी मागणी मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. या संबंधात मी काही दिवसात निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे अशी माहिती आज सोमवार दिनांक ०६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुलुंड मध्ये प्रसार माध्यमांशी बोलले आहे