वणी: संशयीतरित्या फिरत असलेल्या दोघांना शिरपूर पोलिसांनी केली अटक वेळाबाई व येनक येथील घटना
Wani, Yavatmal | Nov 11, 2025 शिरपूर पोलिसांनी वेळाबाई येथे सूर्यास्तानंतर तोंडावर दुपट्टा बांधून संशयित फिरत असताना शेख आशिक शेख इब्राहिम, रा. कुरई याला ताब्यात घेतले. तसेच ग्राम येनक परिसरात आपले अस्तित्व लपवून चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असताना अंकुश मारोती आत्राम, रा. येनक यास पोलिसांनी अटक केली. वरील सर्व संशयित आरोपीविरुद्ध वणी, मारेगाव व शिरपूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.