भोकरदन: रफिक कॉलनी परिसरामध्ये विजेचा लपंडाव, स्थानिक नागरिक त्रस्त
आज दिनांक 11 जून 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील रफिक कॉलनी परिसरामध्ये मागील काही दिवसापासून नागरिक विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाली आहे या कॉलनीला वीजपुरवठा करणारी रोहित्र कमी क्षमतेचे असल्यामुळे या नागरिकांना या विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे ,कारण या रफिक कॉलनी परिसरात सर्वात जास्त विजेचा वापर केला जातो आणि त्यात रोहित्र कमी दाबाचे असल्यामुळे ही अडचण येत असून याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.