जालना: जालना फुलबाजारात झेंडू-गुलाबाला कवडीमोल दर; शेतकरी हवालदिल..
Jalna, Jalna | Apr 18, 2026 जालना फुलबाजारात झेंडू-गुलाबाला कवडीमोल दर; शेतकरी हवालदिल.. आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, जिल्ह्यातील फुलबाजारात सध्या झेंडू आणि गुलाबाच्या फुलांना अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढलेला असतानाही बाजारात मिळणारा भाव अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. अक्षयतृतीया आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना फुलांना चांगली मागणी आणि दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ