चिखलदरा: समोश्यात निघाला मेलेल्या पालीचा पंजा;पथ्रोटमधील स्वीट मार्टवर संतापाचा भडका
मेळघाटातील पथ्रोट येथील मा. चामुंडा बिकानेर स्वीट मार्ट मध्ये तयार करण्यात आलेल्या समोस्यामध्ये मेलेल्या पालीचा पंजा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. सविस्तर माहिती अशी की, पथ्रोट येथील रहिवासी दीपक धारूळकर यांनी बसस्टँड परिसरातील मा. चामुंडा बिकानेर स्वीट मार्ट मधून समोसे व अन्य खाद्यपदार्थ पार्सल करून घरी आणले. त्यांच्या पत्नीने समोसा खात असतांना त्यामध्ये मेलेल्या पालीचा पंजा आढळून आला.