राजूरा: सोशल मीडियावरून माजी आ.वामनराव चटप यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट;
राजुरा व विरूर पोलीस ठाण्यात तक्रार
शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर बदनामीकारक भाषा वापरल्याच्या प्रकाराने शेतकरी संघटना आणि युवकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रकरणी राजुरा आणि विरूर पोलीस स्टेशनमध्ये आज दि 20 सप्टेंबर ला 12 वाजता रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, तात्काळ गुन्हा नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.