जालना: सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; परतूर पोलिसांची प्रभावी कारवाई
Jalna, Jalna | Jun 27, 2026 जालना जिल्ह्यातील सराईत व धोकादायक प्रवृत्तीचा आरोपी गणेश शिवाजी इरेकर वय 27, रा. हातडी, ता. परतूर, जि. जालना याच्याविरुद्ध महाराष्ट्र धोकादायक प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. शनिवार दि. 27 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाम भागवत यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आर. टी. रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.