भंडारा: भंडारा नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी १३; तर नगरसेवक पदासाठी १२५ अर्ज दाखल!
भंडारा नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, १७ नोव्हेंबर रोजी, उमेदवारांची मोठी गर्दी झाली. नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदाकरिता १२५ अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांची दिवसभर लगबग सुरू होती. अखेरच्या दिवसाचा मुहूर्त साधून प्रमुख राजकीय पक्षांनी शहरात रॅलींचे (Rallies) आयोजन केले होते, ज्यामुळे भंडारा शहरात उत्साह आणि गर्दी वाढली होती. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदा