8 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नागपूर पोलीस गुन्हे शाखा युनिट २ ने वाहन चोरीच्या तपासात मोठे यश मिळवले असून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.नारी मेट्रो स्टेशन पार्किंगमधून फिर्यादी आर्यन गजभिये यांची स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास करून एका अल्पवयींनला ताब्यात घेण्यात आले