अकोला: लाडकी बहीण योजनेची केवायसी मुदतीत पूर्ण करा — महिला व बाल कल्याण विभागाचे आवाहन
Akola, Akola | Nov 8, 2025 अकोला : लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी दिलेल्या मुदतीत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महिला व बाल कल्याण विभाग, अकोला यांनी केले आहे. केवायसी अद्ययावत न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित संपर्क साधावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.अशी माहिती दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मिळाली