विद्यापीठ परिसरातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला, अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह शोधला
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 2, 2025
आज रविवार 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अग्निशामक विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली की, आज सकाळी नऊ वाजता पोलिसांनी माहिती दिली की विद्यापीठ परिसरातील विहिरीत एकाचा मृतदेह आहे, अग्निशामक चे मुख्य अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यापीठ परिसरातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यातून काढून बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे, पोलिसांनी सदरील मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.