उरण मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेला भावना घाणेकर प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या शोभा कोळी शहा यांना १४७० मतांनी पराभूत करून त्यांनी विजय मिळवला आहे. गेल्या दहा वर्षापासून वर्चस्व असलेल्या आमदार बादनी यांना मोठा धक्का देत त्यांनी विजय मिळवला असून त्यांनी उरण वासियांचे आभार मानले आहेत.