Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: अवैध वृक्षतोडीविरोधात वनविभाग आक्रमक; नवीन एमआयडीसीसह दोन ठिकाणी वनविभागाची छापेमारी; 7 टनांहून अधिक लाकूड जप्त

Jalna, Jalna | May 15, 2026
महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र जालना उत्तर (प्रा.), वनपरिमंडळ जालना यांच्या नियतहद्दीत अवैध वृक्षतोड करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची मोहीम सुरू असून वनविभागाच्या विशेष गस्ती पथकाने एकाच दिवशी दोन ठिकाणी धडक कारवाई केली. शुक्रवार दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पहिली कारवाई लक्कडकोट भागातील लक्ष्मी सॉमिलजवळ करण्यात आली. येथे अवैधरीत्या कडुलिंब प्रजातीच्या लाकडाची साठवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला.