सातारा: जिल्हा परिषदेत अभियंता दिन साजरा करण्यात आला
Satara, Satara | Sep 15, 2025 भारताचे महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्ताने अभियंता दिन सातारा जिल्हा परिषदेत सोमवारी सकाळी ११ वाजता साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिमराव पाटील यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अभियंता मोहसिन मोदी, अमर नलावडे यांच्यासह मान्यवरांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बांधकाम विभागातील कर्मचारी उपस्थित होते.