ओडिसा राज्यातील अपहृत दोन नागरिकांची सुटका पाच आरोपी अटकेत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याची धाडसी कारवाई दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथकाने एका गंभीर अपहरण, मारहाण व जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून ओडिसा राज्यातील दोन नागरिकांची सुटका केली आहे. सदर घटनेतील फिर्यादी टिपी प्रसाद राजू वय २९ वर्ष, व्यवसाय चालक, रा. पुकाली, जिल्हा कोरापुट, राज्य-ओडिसा व त्याचा मित्र जलंदर पोडाल हे शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले