फिर्यादीने पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे दि. १६ नोव्हेंबर मावस बहिणीचे लग्न असल्याने तीने आपले Acer कंपनीचे लॅपटॉप व इतर सामान हॉल मधील खोली मध्ये ठेवले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले अशा रिपोर्ट वरून पो.स्टे. ब्रम्हपुरी अ कलम ३०३(२) BNS प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, एक इसम हा लॅपटॉप विक्रीच्या उद्देशाने बाजारात फिरत असल्याचे माहितीवरुन ब्रम्हपुरी पोलीसांनी शोध घेत त्याला ताब्यात घेतले.