अंजनगाव सुर्जी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वेद मंदीर येथून पथसंचलन; ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता अंजनगाव सुर्जी येथील वेद मंदीर येथून पथ संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संचलन सायंकाळी वेदमंदिर, गुलजारपुरा येथून प्रारंभ होणार असल्याने सर्व स्वयंसेवकांनी वेळेवर संचलनासाठी वेद मंगल कार्यालय येथे हजेरी लावली. संचलन वेदमंदिर गुलजारपुरा,लाल चौक ,पाचपावली,बुधवारा,माळीपुरा मोठी मळी,लहान मळी,द्वारका चौक,काळे सायकल टॅक्सी, श्री देवनाथ मठ,पाचपावली ते वेद मंदीर येत पर्यंत काढण्यात आले.