अकोल्यात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातच एसीबीने थरारक कारवाई केली आहे. आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक ममता संजय पाटील यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. तक्रारदार हा धान्य व्यापारी असून, गुन्ह्याच्या चौकशीतील नोटशीटवर सहीसाठी पाटील यांनी वीस हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने अमरावती एसीबीकडे धाव घेतल्यानंतर पथकाने सापळा रचून कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयातच केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.