शहरातील इस्लामपूर भागात आमदार संदीप क्षीरसागर यांनी विद्युत महावितरण समस्या संदर्भात नागरिकांची संवाद साधला
Beed, Beed | Oct 19, 2025 बीड शहरातील इस्लामपुरा परिसर, दर्गा रोड या भागामध्ये नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी विशेषतः विद्युत वितरण विभागाशी संबंधित तक्रारी आमदारांसमोर मांडल्या. वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज येणे, तुटलेल्या तारांमुळे होणारा धोका, तसेच काही ठिकाणी वीजमीटर व ट्रान्सफॉर्मरशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या.