मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक 2 डिसेंबरला होणार असून कायदा व सुव्यवस्था आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावी ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना व जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी 26 नोव्हेंबर रोजी संवेदनशील भागांचा दौरा करून पाहणी केली. स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रमांना दोघांनीही प्रारंभ केला. निवडणूक तयारी समाधानकारक असल्याचे त्यांनी म्हटले. ही माहिती पोलीस निरीक्षक व जनसंपर्क अधिकारी शंकर शेळके यांनी सायं. 8.26 वाजता प्रसार माध्यमानां प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे