याप्रकरणी मुथुट फीनकॉर्प वाघोली शाखेच्या मॅनेजर कविता रजीश यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत गुंजाळ, भुषण लटांबळे (दोघेही रा. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही संगनमताने १० ते १२ टक्के सोने व बाकी बनावट असलेले ११६ ग्रॅम वजनाचे दागिने गहाण ठेवून वेगवेगळे कर्ज घेतले होते. व्याजासह ८ लाख २ हजार रुपयांची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.