बुलढाणा: जिल्हा परिषद सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले
बुलढाणा जिल्हा परिषद सेसफंड योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतुन 75 टक्के अनुदानावर 5 एचपी मोटरपंप संच, पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर्स, बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर्स, मानवचलीत स्पायरल सीड सेपरेटर, विद्युत चलीत चाफ कटर, मानवचलीत टोकनयंत्र (डिबलर) साहीत्य पुरविणे प्रस्तावीत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.