शेगाव: जलंब रेल्वे स्टेशन येथे आईने चिमुकल्याला बाजूला सोडून केली रेल्वेखाली आत्महत्या
कौटुंबिक वादातून मनस्ताप झालेल्या मातेने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या चिमुकल्या मुलाला बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान जलंब रेल्वे स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.जलंब येथील सौ कल्पना विठ्ठल घुले (२२) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे रागाच्या भरात कल्पना विठ्ठल घुले या घरून आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन रेल्वे स्टेशन कडे निघाल्या.