बार्शीटाकळी: बार्शीटाकळीच्या दगडपारवा गावात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला परिसरात उडाली एकच खळबळ.
बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा गावात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनंता नामदेव सरगर वय ३९ यांचा मृतदेह १४ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या घरात आढळला. दुर्गंधीमुळे ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अजय वानखडे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मृत्यूला तीन दिवस उलटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वाताव